चंपारण्य सत्याग्रह ः 3
चंपारण्य सत्याग्रहाच्या आठवणी लिहीताना राजेंद्रप्रसादांनी दोन गोष्टी लिहिल्या आहेत. राजेंद्र प्रसाद यांच्या घरी ज्यावेळी राजकुमार शुक्लांना घेऊन महात्माजी गेले तेव्हा त्यांना तिथे अत्यंत तुच्छतेची वागणूक मिळाली. जातीपाती त्याकाळात पाळल्या जात. गांधीजींना राजेंद्रबाबूंच्या नोकराने सांगितले की तुम्ही इकडे बाहेर बसा आणि हे बाहेरचे स्वच्छतागृह वापरा. ते स्वच्छतागृह शुद्रांसाठी होते. त्यावेळी राजेंद्रबाबूंची भेट झाली नव्हती. चंपारण्य सत्याग्रहात देशभरातील मान्यवर सहभागी झाले होते. लोकांच्या तक्रारी एकून घेणे. त्यानंतर त्या सरकारला पोहचविणे असे त्याचे स्वरुप होते. हजारो लोकांच्या तक्रारी दाखल झाल्या. सरकारने एक समिती नेमली. त्यात सरकारचे दोन प्रतिनीधी, इंग्रजांचे दोन प्रतिनीधी, शेतकऱ्यांचे प्रतिनीधी म्हणून महात्माजी होते. सरकारने या सत्याग्रहानंतर तीन कठियाचा कायदा रद्द केला.
या सत्यग्रहाच्या आठवणी लिहिताना राजेंद्रबाबू जे की भारताचे पहिले राष्ट्रपती झाले, त्यांनी दोन आठवणी लिहिल्या आहेत. सत्याग्रहासाठी जमलेले मान्यवर वेगवेगळ्या चुलीवर स्वयंपाक करुन खात होते. गांधीजींनी सगळ्यांना एकाच चुलीवरचा स्वयंपाक करायला आणि खायला सांगितला. जातीभेद दुर झाले पाहिजे, यासाठीची ही कृती होती. पहिल्यांदाच घराबाहेर आणि उच्चवर्णीय आचाऱ्याशिवाय कोणतीही गोष्ट न पाहता मी जेवण केल्याचे राजेंद्रबाबूंनी म्हटले आहे. दुसरी गोष्ट एक दिवस रात्री गांधीजींच्या खोलीतून आवाज येत असल्याचे त्यांना ऐकू आले. ते गेले तर गांधीजीं स्वतःचे कपडे स्वतः धूत असल्याचे त्यांना दिसले. मी त्यातून स्वावलंबनाचा धडा घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे.
चंपारण्याताल हा सत्याग्रह यशस्वी झाला. तीन कठियाचा कायदा रद्द झाला. गांधीजी देशातील शेतकऱ्यांच्या गळ्यातील ताईत बनले. या काळातील सतत त्यांच्याबरोबर असलेल्या महादेवभाईंनी लिहिलेली आठवणही गांधीजींच्या निर्भयतेची साक्ष देणारी आहे. गांधीजी सतत माणसात असत. या काळात एक निळीचा व्यापारी असे म्हणाला की एकटा सापडू दे गांधीला खलासच करतो. हे महात्माजींच्या कानावर आले. ते एक दिवस पहाटे लवकर उठून त्या व्यापाऱ्याच्या दारात गेले. त्याला म्हणाले, मी तरी काय करु. सतत लोक माझ्याबरोबर असतात. आता मी एकटाच आहे. तर तु तुझे काम करुन घे. मला खलास कर. तुझी प्रतिज्ञा पूर्ण कर.' तो व्यापारी खजील झाला.
1917 सालातील ही घटना. त्यानंतर आयुष्याच्या अखेपर्यंत गांधीजींचा व्यवहार असाच निर्भय होता.
महात्माजींनी म्हटले आहे, "अपकाराचा मोबदला अपकार नसून उपकार आहे. जो पाणी देईल त्याला चांगले जेवण घालावे. जो आपल्याशी डोके नमवेल, त्याला सांष्टांग दडंवत घालावा. एका पैशाची झीज सोसेल त्याचे मोहरांनी ऋण फेडावे. प्राण वाचविल त्याच्या दुःख निवारणाच्या कामी प्राण वेचावे. एका उपाराबद्दल दहा उपकार करावेत. परंतु जगात सर्वक्षेष्ठ तोच जो काया वाचा मनेकरुन अपकाराच्या बाबतीत उपकारच करतो.'
महात्मा गांधी यांची यांची शनिवारी पुण्यतिथी. त्यानिमित्त महात्माजींच्या विविध पैलूंचे केलेले स्मरण........
शनिवार, ६ फेब्रुवारी, २०१६
जातीभेद, स्वावलंबन
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा